Thursday, May 17, 2012

फुंकर

फुंकर घालायचीच असेल तर
थेट जखमेवरच घातली पाहिजे असं नाही...
जखम शरीरावर असली तरी वेदना मनातही असते
तिथेच घालायची फुंकर.... अलवारपणे...
.
.
शरीरावरचा घाव कधी ना कधी होईलच बरा!
फार फार तर सोडेल एखादा फिकुटलासा व्रण...
पण मनातला सल वेळीच नाही उपटला
तर...
रुतत जातो आत!
त्यालाच आधी करून टाकायचा नाहीसा!
.
..
आणि हो!
त्यासाठी प्रत्येक जखमेचं मूळ माहीत असायलाच हवं
याची काही आवश्यकता नाही!
.
..
हे शिकलेय.... तुझ्याकडूनच!


--शुभा मोडक (२३-एप्रिल-१२)

1 comment:

  1. त्यासाठी प्रत्येक जखमेचं मूळ माहीत असायलाच हवं
    याची काही आवश्यकता नाही!


    किती किती खरंय...
    तुझ्या कविता खूप छान आहेत गं...कधी जास्त कविता न वाचणारी एक म्हणतेय म्हणजे खरे वाचक वेडेच होत असतील..(take is as a compliement please...you really really are very good and you prbly know it already...:) )

    ReplyDelete